शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा Ø 8 फेब्रुवारीपर्यंत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज आमंत्रित

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा

Ø 8 फेब्रुवारीपर्यंत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज आमंत्रित

 

चंद्रपूर, दि. 31 : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.

 

ऑनलाइन अर्ज https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या वेब लिंकवर सादर करावा. ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा कालावधी दि. 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2023 असणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 8 फेब्रुवारी 2023 असेल. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी 15 फेब्रुवारी 2023 पासून असेल. तर ऑनलाईन परीक्षा दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येईल. (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार यामध्ये बदल होऊ शकतो.)

 

सदर परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.