गडचिरोली ते भानुप्रतापपूर ( छ.ग.) नवीन रेल्वे मार्ग सर्वे साठी मंजूर…

गडचिरोली ते भानुप्रतापपूर ( छ.ग.) नवीन रेल्वे मार्ग सर्वे साठी मंजूर…

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांच्या प्रयत्नांना यश!

गडचिरोली:-गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्तीसगड राज्याला रेल्वे लाईनने जोडण्याची नितांत आवश्यकता होती ही आवश्यकता आता पूर्ण होणार आहे. दळणवळनाच्या दृष्टीकोनातून व व्यापार पेठ च्या दृष्टीकोनातून या रेल्वे लाईनला फार महत्व आहे कारण छत्तीसगड राज्यातील येथील अनेक व्यावसायिक गडचिरोली येथे व्यवसाय करण्यास इच्छुक आहे व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक छत्तीसगड राज्यात व्यवसाय करण्यास इच्छुक आहे त्यामुळे मध्यप्रदेश छत्तीसगड आणि यामधे व्यापार पेठ अधिक दृढ होणार आहे व दळणवळण वाढणार आहे

आधीच गडचिरोली ते सीरोंचा रेल्वे लाईन मंजूर झाली आहे सदर पुढील आवश्यक प्रशासकीय कार्य केंद्र व राज्य सरकार द्वारे संयुक्तपणे सुरू आहेत तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे लाईन मंजूर झाले आहे सदर रेल्वे लाईन करिता जमिनीचे अधिग्रहण युद्धस्तरावर सुरू आहेत व विशेष म्हणजे खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नाने प्रामुख्याने नुकताच गडचिरोली ते

भानुप्रतापपूर नवीन रेल्वे लाईन साठी सर्वे मंजूर झाल्या बद्दल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे,