गडचिरोली || शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार बाबत

गडचिरोली || शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार बाबत

 

गडचिरोली, दि.16: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्या-या खेळाडूंच्या गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार,क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार /जिजामाता पुरस्कार,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(खेळाडू),शिवछत्रपती राज्य साहासी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), असे पुरस्कार प्रदान करते.

शासनाच्या नुकत्याच दि. 14 डिसेबंर 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20,2020-21,2021-22 या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यतील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक,खेळाडू,दिव्यांग खेळाडू यांच्यमार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करु घेऊन,व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन विहीत वळेत 3 प्रतीत प्रस्तावाचे हार्ड कॉपीत सादर करावेत.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि. 16 ते 30 जानेवरी 2023 अशी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहीतीसाठी क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पाहावे. पुरस्करासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक,खेळाडू,दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत प्रशांत दोंदल,जिल्हा क्रीडा अधिकारी,गडचिरोली या टिप्पणी अन्वये आवाहन करीत आहे.