चाचा नेहरु बाल महोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरण संपन्न

चाचा नेहरु बाल महोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरण संपन्न

गडचिरोली, दि.13: महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुलींच्या कला गुणांना वाव मिळून त्यांचा सर्वागिन होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव क्रिडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दिनांक १० ते १२ जानेवारी या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यादेवी बालसदन घोट येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचा दिनांक १२ जानेवारीला समारोप करण्यात आला.

सदर बाल महोत्सवात स्वयंसेवी संस्था मधील प्रवेशीत मुली व स्थानिक शाळामधील मुली यांना सहभाग करुन त्याच्यासाठी कब्बडी स्पर्धा, १०० मीटर धावने, निबंध, रांगोळी, चित्रकला, घोषवाक्य, सामान्यज्ञान, एकल नृत्य, सामुहिक नृत्य एकल गायन, सामुहिक गायन, नकला इत्यादी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाला उद्धघाटक म्हणून प्रशांत व्यवहारे विभागीय अधिक्षक उपायुक्त कार्यालय नागपुर, अध्यक्ष म्हणून वर्षा मनवर बाल कल्याण समीतीचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी बाल कल्याण समीतीचे सदस्य डॉ. संदिप लांजेवार, दिनेश बोरकुटे, अॅड राहुल नरुले, काशीनाथ देवगडे, प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली, हेमंत सवई परिविक्षा अधिकारी नागपुर. जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, अधिक्षिका निर्मला टोप्पो, विजयश्री अगडे मुख्याधापीका नवोदय मराठी उच्च प्राथ हायस्कुल घोट, प. पु. महात्मा गांधी कनिष्ठ महाविदयालय घोट चे प्राचार्य नागोसे देशोन्नती चे पत्रकार उपाध्ये, पी.डी. कोवाची शिक्षक जि. प. म.गा. विदयालय घोट, सारीका वंजारी विधी सल्लागार अधिकारी, परिविक्षा अधिकारी विलास ढोरे उपस्थित होते. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी तसेच वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.

सर्व स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय पदके पुढीलप्रमाणे – नवोदय मराठी उच्च प्राथ हॉयस्कुल घोट एकुण ११, प.पु. महात्मा गांधी कनिष्ठ महाविदयालय घोट एकुण २४, जि. प. म.गा. विदयालय घोट एकुण १२, केंद्रीय नवोदय विदयालय घोट एकुण १२, अहिल्यादेवी बालगृह घोट एकुण १० पदके पटकावली.

यावेळी अहिल्यादेवी बालगृहातील ३ बालकांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे संचालन जयंत जधाडे तर आभार विनोद पाटील यांनी केले.