शिक्षक मतदार संघ निवडणूक- जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 पर्यंत

शिक्षक मतदार संघ निवडणूक- जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 पर्यंत

 

गडचिरोली,दि.13: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -2022 च्या निवडणूक अनुषंगाने सर्व शिक्षक मतदारांना सुचित करण्यात येते की, मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे कडून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दिनांक 30.01.2023 रोजी सकाळी 08.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंतची वेळ ठरवून दिलेली होती. परंतू त्यात मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी बदल करुन या निवडणूकीसाठी मतदान करण्याची वेळ सकाळी 7.00 वाजेपासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यत राहिल असे कळविले आहे. तरी या निवडणूकीमध्ये शिक्षक मतदारांनी वरील वेळेत जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर विभाग, शिक्षक मतदार संघ तथा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.