चाचा नेहरु बाल महोत्सवातील कबड्डी सामन्यात बालगृह घोट येथील मुलींनी पटकवला प्रथम क्रमांक

चाचा नेहरु बाल महोत्सवातील कबड्डी सामन्यात बालगृह घोट येथील मुलींनी पटकवला प्रथम क्रमांक

 

गडचिरोली, दि.11: महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या मार्फत जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुला मुलींमध्ये एकमेकांविषय बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव व क्रिडा स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर बाल महोत्सवात अहिल्यादेवी बालसदन घोट,केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय घोट,जि.प.म. गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविदयाल घोट,प.पु. महात्मा गांधी विद्यालय घोट,नवोदय मराठी उच्च प्राथ.तथा हॉयस्कुल घोट येथील मुलींनी सहभाग घेतला होता.सदर कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण 5 संघांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये चुरशीच्या व रोमहर्षक कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बालगृह घोट येथील मुलींनी पटकवला,व दुसरा क्रमांक केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय घोट येथील मुलींनी पटकवला.त्यानंतर सायंकाळी सामूहिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली.त्यामध्ये एकुण 4 शाळेतील मुली व बालगृहातील मुली यांनी सामुहिक नुत्य उत्कृष्टरित्या सादर करण्यात आले. स्पर्धेवेळी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम,चामोर्शी तहसिलदार संजय नागटिळक, बाल कल्याण समीतीचे अध्यक्षा वर्षा मनवर, लोकमंगल संस्थेचे संचालिका अँड.शायनी गर्वसीस,जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील,विधी सल्लागार अधिकारी सारीका बंजारी,पोलिस पाटील हरिदास चलाख,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,अहिल्यादेवी बालसदचे अधिक्षिका निर्मला टोप्पो उपस्थित होते.

सदर बाल महोत्सवात दिनांक 11 जानेवारी 2023 ला 100 मीटर धावणे, निबंध, रांगोळी, चित्रकला, घोषवाक्य, सामान्य ज्ञान, एकल नृत्य, एकल गायन, सामुहिक गायन, नक्कला इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहे. तीन दिवशीय चालणाऱ्या बाल महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम 12 जानेवारी रोजी होणार असून सदर बक्षिस वितरण कार्यक्रमाला आर.आर. पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली,श्रीमती अपर्णाताई कोल्हे, विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास नागपुर विभाग नागपुर,डॉ. सविता गोविंदवार सदस्या बाल न्याय मंडळ गडचिरोली,श्रीमती वर्षा मनवर अध्यक्षा बाल कल्याण समीती गडचिरोली, डॉ.पी.एन.बाघ सदस्य बाल न्याय मंडळ गडचिरोली इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना व सहभागीय स्पर्धकांना बक्षित वितरण करण्यात येणार आहे.