भंडारा | आज विभागस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेचे आयोजन

भंडारा | आज विभागस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेचे आयोजन

 

भंडारा दि 9: स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान (उमेद), बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील प्रशिक्षित महिलांकरीता विभागस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धाचे आयोजन उद्या 10 जानेवारी रोजी लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला महाबोधी विहारासमोर, शास्त्री चौक येथे करण्यात आले आहे.

 

या स्पर्धेसाठी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील आसेटीद्वारे प्रशिक्षीत प्रशिक्षणार्थ्यांची, प्रोसेस, प्रोडक्ट, ॲग्रीकल्चर यावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

तरी नागरिकांनी या स्पर्धांना उपस्थित राहण्याचे आवाहन आरसेटीचे निर्देशक मिलींद इंगळे यांनी केले आहे.