मोहाडीचा ‘टसर’ ब्रॅण्डच : बी. वैष्णवी माविम जिल्हा कार्यालयात ‘टसर’संबंधी काम करणाऱ्या महिलांशी संवाद

मोहाडीचा ‘टसर’ ब्रॅण्डच : बी. वैष्णवी माविम जिल्हा कार्यालयात ‘टसर’संबंधी काम करणाऱ्या महिलांशी संवाद

 

भंडारा दि 7: टसर धाग्याची निर्मिती फक्त विदर्भामध्ये मोहाडी तालुक्यातच केली जाते. या उद्योगांमध्ये बचत गटातील महिलांचा समावेश असून बचत गटांनीच मोहाडी ‘टसर’लाच ब्रॅण्ड बनवावे, असे असे प्रतिपादन तुमसर उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांनी केले.

 

महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या माविम महिला प्रांगण येथे दि. ०७ जानेवारी २०२३ रोजी आयोजित ‘टसर’संबंधी काम करणाऱ्या महिला सोबतच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

 

बी. वैष्णवी पुढे म्हणाल्या, मोहाडी तालुक्यामध्ये आंधळगाव हे टसर निर्मितीचे केंद्र असुन रेशीम कोस पासुन धाग्या व कापड निर्मिती करण्यात येते. यापासून बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होत असून त्यांची उपजीविका यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे कोसा पासुन निर्माण होणारे कापड प्रत्येकाने उपयोगात आणले पाहिजे. शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस हा कापड घातला पाहिजे, अशी त्यांनी यावेळी सुचविले. रेशीम कापडावर काथावर्क करण्यात येतो, हा काथावर्क आकर्षक व दर्जेदार कसे करता येईल यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. इंस्ट्राग्रामवर अकाउंट तयार करून प्रसिद्धी करणे, स्टोल डीझाईन बदलणे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच २६ जानेवारीला सर्व शासकीय अधिकारी यांनी टसर कपडे परिधान करणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केलेत व याबाबत जिल्हाधिकारी सोबत बोलुन कापड विक्रीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात दालन उभे करण्यात येईल असे सुचविले.

यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे उपस्थित होते. लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, वनमाला बावनकुळे, गौतम शहारे, सहयोगीनी, उमेदचे श्री पटले तसेच टसर’संबंधी काम करत असलेल्या बचत गटातील महिला उपस्थित होत्या.