गोंदेडा (गुंफा) ता.चिमुर जि.चंद्रपुर येथे ६३ वा गुंफा यात्रा महोत्सव निमित्ताने गोपालकाला

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज व ग्रामगीतेच्या माध्यमातून मानवतावादी प्रेरणेचे विचार अंगीकारा,खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन

गोंदेडा (गुंफा) ता.चिमुर जि.चंद्रपुर येथे ६३ वा गुंफा यात्रा महोत्सव निमित्ताने गोपालकाला

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या यात्रा महोत्सव निमित्ताने उपस्थिती गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मान.अशोकजी नेते,चिमुर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार मान.बंटीभाऊ ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया, वि.प.माजी आमदार मितेशजी भांगडिया सोबत लाखोंच्या संख्येने गुरुदेव भाविक भक्तांचा अफाट महासागरात साजरा व संपन्न झाला

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदेडा (गुंफा) ता.चिमुर या तपोभूमीत राष्ट्रसंताची कर्मभूमी आहे. या यात्रा महोत्सवातील गोपाल काला समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साऱ्या विश्ववाला मानवतेचा संदेश देऊन त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. माणूस द्या! मज माणूस द्या ! माणसांनी माणसासारखं वागल पाहिजे व जगलं पाहिजे अशी शिकवण दिली ग्रामगीतेच्या माध्यमातून जनजागृती,अंधश्रद्धा निर्मूलन, समाज सुधारणा, संघटन, शिक्षण, सर्वधर्म समभाव आदी भजन- कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करणे, भौतिक तसेच आध्यात्मिक स्वरूपात सामाजिक सुधारणा इत्यादी अंतर्भुत करून अंगीकारलं पाहिजे.वंदनीय तुकडोजी महाराजांनी केलेले कार्य अमूल्य व जगाला मानवतावादी संदेश देणारे आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी माझा पुरेपूर प्रयत्न राहिल असे सकारात्मक विचार व्यक्त केले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज व ग्रामगीतेच्या माध्यमातून मानवतावादी प्रेरणेचे विचार अंगीकारा असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी या प्रसंगी केले यात्रा महोत्सव गोपालकाला या निमित्ताने चिमुर विधासभा क्षेत्राचे लाडके आमदार बंटीभाऊ ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया यांनी राष्ट्रसंताच्या या कर्मभूमीत व्यसन मुक्ती,दारूमुक्तीसाठी गावात ठराव पारित करून बंद केले पाहिजे. राष्ट्रसंतांचे विचार व प्रेरणा त्यांनी लाखों भाविक भक्तांना आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध करून मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विधा.प.माजी आमदार मितेशजी भांगडिया यांनी सुद्धा याप्रसंगी गुरुदेव च्या भाविक भक्तांना जयगुरु असा संदेश देत नववर्षाच्या शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विकास कामांचे भुमिपुजन, रक्तदान शिबिर,विविध आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधी उपचार, प्रामुख्याने रक्तदान शिबिरात या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते व चिमुर विधानसभेचे लाडके आमदार बंटीभाऊ ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया यांनी रक्तदान केले.या प्रसंगी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, चिमुर विधासभा क्षेत्राचे आमदार तथा संचालक गुरुकुंज आश्रम मोझरी किर्तीकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया, माजी विधा.प. आमदार मितेशजी भांगडिया,ह.भ.प.काळे महाराज,राजुभाऊ देवतळे केंद्रीय सदस्य गुरुकुंज आश्रम मोझरी, राजु पा. झाडे अध्यक्ष भाजपा चिमुर,प्रशांतजी वाघरे महामंत्री गड,स्वागताध्यक्ष बोंडेताई, भाजपाचे वसंतराव वारजूरकर, डॉ.बियाणी,डॉ.शामजी हटवादे उपाध्यक्ष,घनश्यामजी डुकरे, डॉ.गजभिये,विठ्ठल राव सावरकर अध्यक्ष गु.से.स.,गिरीजाबाई गायकवाड सरपंच,दामोदर पाटील मायाताई ननावरे महिला आघाडी च्या अध्यक्ष, आशा ठाकरे, आशा मेश्राम, प्राध्या.वाढई संजय नवघडे, बंटी वनकर, एकनाथ थुटे,बोथे जी,उषाताई वाढई अध्यक्ष गु.से.स.तसेच अनेक पदाधिकारी व गुरुदेव भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.