शिक्षक मतदारसंघ निवडणूक कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

शिक्षक मतदारसंघ निवडणूक कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

भंडारा, दि. 5 : महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज बैठक घेतली. या बैठकीला पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, आकाश अवतारे, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश मोरे उपस्थित होते.

 

यामध्ये निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिले.

 

शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहणार आहे.

 

निवढणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 5 जानेवारी 2023, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2023, नामनिर्देशन पत्राची छाननी 13 जानेवारी 2023, अमेदवारी अर्ज मार्ग घेण्याची अंतिम दिनांक 16 जानेवारी 2023, मतदानाचा दिनांक 30 जानेवारी 2023, मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणी दिनांक 2 फेब्रुवारी 2023 व निवडणुक प्रकिया पूर्ण करण्याचा दिनांक 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत निवडणूक कार्यक्रम राहणार आहे.

 

मतदान केंद्र निहाय मतदार पुढीलप्रमाणे आहेत.

 

नाकाडोंगरी-44 येथे एकूण 105 मतदार, तुमसर-45 येथे 558 मतदार, मोहाडी-46 येथे 224 मतदार मतदार, भंडारा-47 येथे 984 मतदार, सावरी जवाहरनगर-48 येथे 134 मतदार, धारगाव-49 येथे 40 मतदार, साकोली-50 येथे 493 मतदार, लाखनी-51 येथे 389 मतदार, पालांदूर-52 येथे 83 मतदार, अड्याळ-53 येथे 195 मतदार, पवनी-54 येथे 313 मतदार व लांखांदूर-55 येथे 198 मतदार असे एकूण जिल्ह्यात 3 हजार 716 मतदार आहेत.

 

निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे हे आहेत. आज अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पदवीधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीच्या तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.