चंद्रपूर | आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा लिलाव

आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा लिलाव

 

चंद्रपूर, दि. 03: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपुरी येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करण्यात येत आहे. याकरीता दि. 17 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर लिलाव आयोजित करण्यात येत आहे. तरी, इच्छूक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खेड रोड, शिवाजी नगर, ब्रम्हपुरी येथे अधिकृत लेख्यासह उपस्थित राहावे, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपुरीचे प्राचार्य आर. एम. डांगे यांनी कळविले आहे.