नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 जिल्ह्यातील प्रिंटर्ससोबत निवडणूक विभागाची बैठक

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 जिल्ह्यातील प्रिंटर्ससोबत निवडणूक विभागाची बैठक

 

भंडारा, दि. 4 : शिक्षक मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख प्रिंटरची निवडणूक शाखेने बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

 

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 करिताची आचार संहिता लागू झालेली असून लोकप्रतिनिधीत्व कोणत्याही व्यक्तीला त्याच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नांव व पत्ता नसेल असे कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तिपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही अथवा मुद्रित करवता येणार नाही.

 

(1) कोणत्याही व्यक्तिला निवडणूक पत्रक किंवा भित्तिपत्रक

 

(क) ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे याबददलचे स्वतः स्वाक्षरित केलेले आणि ज्या व्यक्ती तिला व्यक्तिश: ओळखतात अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन त्याने मुद्रकाला दोन प्रतीमध्ये दिल्याशिवाय आणि

 

(ख) तो दस्तऐवज मुद्रित झाल्यानंतर वाजवी मुदतीच्या आत, मुद्रकाने कागदाच्या एका प्रतीसह अधिकथनाची एक प्रत

 

(2) तो राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी मुद्रित झाला असेल तर, मुख्य निर्वाचन अधिकाऱ्याला आणि

 

(3) इतर कोणत्याही बाबतीत तो ज्या जिल्हयामध्ये मुद्रीत झाला असेल त्या जिल्हयाच्या जिल्हादंडाधिका-याला

 

(4) या कलमाच्या प्रयोजनार्थ

 

(क) कागदपत्र हाताने नकलून काढण्याच्या प्रक्रियेहुन अन्य कोणतीही अनेक प्रती काढण्याची प्रक्रिया म्हणजे मुद्रण असल्याचे समजण्यात येईल आणि मुद्रक या संज्ञेचा अर्थ तदनुसार लावला जाईल आणि

(ख) निवडणूकपत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ, उमेदवाराच्या किंवा उमेदवारांच्या एखाद्या गटाच्या निवडणुकीचे प्रचालन करण्यासाठी किंवा निवडणुकीला बाधा आणण्यासाठी वाटण्यात आलेले कोणतेही मुद्रितपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किंवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तिफलक, असा होतो पण निवडणूक सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर तपशील किंवा निवडणुक प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांच्यासाठी नेहमीच्या सूचना जाहीर करणारी हस्तपत्रके, घोषणाफलके किवा भित्तीपत्रक यांचा समावेश होत नाही.

(5) जी व्यक्ती, पोटकलम (1) किंवा पोटकलम (2) मधील कोणत्याही उपबंधाचे अतिक्रमण करील तो व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल,

मुद्रकाने, प्रकाशकाने तसेच दैनिक वृत्तपत्रांच्या संपादकाने,अभिकथनाच्या एक प्रतीसह सदर छापील साहित्याच्या/ वृत्तपत्राच्या जाहिरातीच्या चार प्रती व त्यासोबत छापील साहित्याची संख्या दराबाबत तक्ता संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना अथवा मा.जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करावे.

सदर नियमांचे/कलमांचे तरतुदी होर्डींग आणि फ्लेक्स बोर्डलाही लागू होतात, कि या संदर्भातील माहिती संबंधित पक्ष/ उमेदवार यांनी होर्डींग / फ्लेक्स बोर्ड च्या 2 छायाचित्रासह संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांना जोडपत्र 16 मध्ये द्यावी.