तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी फार्मासिस्ट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नर्सिंग कॉलेज प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सभा

तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी फार्मासिस्ट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन

आणि नर्सिंग कॉलेज प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सभा 

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

भंडारा, दि. 3 : कोरोना तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यातील फार्मासिस्ट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नर्सिंग कॉलेज प्रतिनिधी यांची सभा घेतली.

जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असून व ओमायक्रोनचा प्रसार हा अधिक वेगाने होत आहे. हे लक्षात घेता यावेळी अधीकचे मनुष्यबळ लागणार आहे. अशावेळी नर्सिंग कॉलेजच्या व्यवस्थापकांनी तयारीत राहावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

खाजगी इस्पितळात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवान्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने अर्ज सादर करावे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, फार्मासिस्ट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नर्सिंग कॉलेज प्रतिनिधी उपस्थित होते.