sindewahi l नगरपंचायत तर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल रैली काढून दिला जनजागृति संदेश

नगरपंचायत सिंदेवाहि द्वारे आयोजित सिंदेवाहि शहरात केंद्र शासन आणि राज्य शासन द्वारे दिलेल्या दिशा-निर्देशानुसार स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ आणि वसुंधरा अभियान-२०२१ जनजागृतिपर कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आशाताई गंडाटे नगराध्यक्ष, प्रमुख अतिथि स्वप्निल कावळे नगरउपाध्यक्ष,डॉ.सुप्रिया राठोड मुख्याधिकारी,नरेंद्र भैसारे गटनेता तथा नगरसेवक,सुरेशभाऊ पेंदाम माजी बांधकाम सभापति, नंदाताई बोरकर सभापती महिला बालकल्याण,भुपेशजी लाखे नगरसेवक,युनुसभाई शेख अध्यक्ष जैवविविधता व संवर्धन विभाग,डॉ रिजवान शेख राष्ट्रीय सेवा विभाग प्रमुख सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाहि,डॉ जनबन्धु मेश्राम एन. एस. एस विभाग प्रमुख सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाहि, प्रा, डॉ. नागलवाडे क्रीड़ा विभाग प्रमुख सागुळले साहेब अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ,माधव आदे अध्यक्ष भजन मंडल सिंदेवाहि,विनय खोब्रागडे सर, कावळे सर,संगीता यादव प्राचार्या स. क. विद्यालय सिंदेवाहि इत्यादि न.प. प्रांगनातील मुख्य गांधी चौक येथील मंचावर स्थानापन्न होते
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंताच्या स्वच्छतेवर आधारित भजनाने करण्यात आली, प्रास्ताविक पंकज आसेकर अधीक्षक न.प. सिंदेवाहि यानी केले तर स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि वसुंधरा अभियान यावर उपयुक्त असे अभ्यासु मार्गदर्शन डॉ जनबन्धु मेश्राम यानी केले, डॉ रिजवान शेख, माधव आदे, स्वप्निल कावले, युनुसभाई शेख आदिनी मार्गदर्शन पर महत्वपूर्ण विचार आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत सौ आशाताई गंडाटे अध्यक्ष न.प. सिंदेवाहि यानी व्यक्त केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधत गुरुदेव सेवा मंडळाद्वारे मुख्याधिकारी डॉ.सुप्रिया राठोड न.प. सिंदेवाहि याचा गौरव-सत्कार “ग्रामगिता” देवून करण्यात आले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ असे सूत्रसंचालन श्री युनुसभाई शेख यानी केले आणि सर्व मान्यवर अतिथिनचे आभार श्री सुधाकरजी निकुरे यानी व्यक्त केले.
शहराती प्रमुख चौकातुनि सायकल रैली काढ़न्यात आली या मध्ये विशेषतः सर्वोदया महाविद्यालय सिंदेवाहि, सर्वोदया कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाहि, सर्वोदया कन्या विद्यालय सिंदेवाहि, येथील राष्ट्रीय सेवायोजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनी मोलाचे सहकार्य केले या सोबतच नगरपंचायत सिंदेवाहि येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सर्वाणिच मोलाचे योगदान देत मुख्याधिकारी न.प. सिंदेवाहि यांच्या मार्गदर्शनाथ आयोजित या कार्यक्रमास यशस्वी करुण दाखविन्यास बहुमूल्य असे सहकार्य केले शेवटी या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने झाली.