Chandrapur l sindewahi महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्रा.) तर्फे तहसिलदार यांना निवेदन.

मतदान केंद्राध्यक्ष/ मतदान अधिकारी यांना RT-PCR टेस्ट करण्याचे आदेश आहेत. त्यासोबतच संपर्कात येणाऱ्याना सुद्धा कोविड- 19 अनुषंगाने योग्य दिशानिर्देश देण्यात यावे. मतदान बूथ शाळेत असतात, त्यामुळे मुख्याध्यापक याना जबाबदार न धरता यासाठी ग्रामपंचायत/ तलाठी कार्यालय याना दिशानिर्देश देण्यात यावे. ग्रामपंचायत निवडणूकित अनुज्ञेय मानधन/ भत्ते इत्यादी रक्कम मिळण्यास दीर्घकाळ लागत असल्याने यावेळी ते सर्व मानधन, भत्ते तात्काळ देण्यात यावे. महिला, दिव्वांग, गंभीर आजारग्रस्त, 53 वर्षावरील कर्मचारी याना निवडणूक कामातून वगळण्यात यावे. मतदान केंद्रस्थळी, तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयस्थळी निवडणूक दरम्यान आरोग्यपथक नेमण्यात यावे. अशाप्रकारचे निवेदन जिल्हाध्यक्ष मोरेश्वर गौरकार, तालुकाध्यक्ष दिनेश टिपले, कार्यवाह नामदेव सुरपाम , कोषाध्यक्ष युवराज सोनवणे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश कोयताडे व संजय मोहूर्ले यांच्या उपस्थितीत दिले.