sindewahi l सिंदेवाही पोलिस स्टेशनचे व निवडणूक निर्णय अधिकारी सिंदेवाही यांचे युवा बिग्रेड संघटनेच्या वतीने कौतुक.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील ४५ ग्रामपंचायत निवडणूकांचा मतदान शांततेत सुव्यवस्थीत पार पडला.
सिंदेवाही पोलिसांनी व तालुका दंडाधिकारी यांनी निवडणुकीतील उमेदवारांची पक्षपाती व जातीपातीचा, गरिबी श्रीमंतीचा भेद न ठेवता रात्रंदिवस काम करत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखली . याचे खरे श्रेय पोलिस निरीक्षक योगेश घारे तालुका दंडाधिकारी पर्वणी पाटील व पोलीस उपनिरीक्षक गोपिचंद नेरकर व खास करुन पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवाने व संपूर्ण टिमचे अभिनंदन व आभार युवा बिग्रेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल निन्नावे यांनी केले आहेत.