Chandrapur l sindewahi दारुच्या नशेत पोलिस स्टेशन सिंदेवाही परिसरात आत्महत्येचा प्रयत्नात शेवटीं रूग्णालयात मृत्यू.

सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या आवारात आत्महत्या करण्याचा प्रयत्न सिंदेवाही शहरातील रहिवासी अशोक महादेव रावुत याने दारुच्या नशेत केला.

मृत अशोक महादेव रावुत हा दारूच्या अती आहारी गेलाने परीवारातील संपुर्ण सदस्य त्रासलेले होते अशोकच्या वाईट वागणुकीचा त्रास असाह्य झाल्याने त्यांची बायको त्याला सोडून माहेरी राहत होती काही दिवसांपूर्वी बाहेर जिल्ह्यात कामाला गेला होता.तिथुन परत आला तेव्हा त्यांच्याकडे सात आठ हजार रुपये होते त्यामुळे दारू पिऊन घरी धिंगाणा घालत होता. काल रात्री दिड वाजता संख्या मामासोबत भांडून मामाच्या विरोधात पोलीस स्टेशन मधे तक्रार देण्यासाठी गेला. तेव्हा पोलिस अंमालदार यांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे तक्रार दाखल केली.अशोक रावुत हा घरी जावुन परत पुन्हा सकाळी सहावाजेच्या सुमारास दारू पिऊन पोलिस स्टेशन येथे आला तेव्हा पोलिस अंमालदार यांनी त्याला बाहेर बसण्यासाठी सांगितले. तेव्हा तो बाहेर बसला व थोड्याच वेळात त्याने तिथे सोशल अंतर ठेवण्यासाठी बांधलेली दोरी तोंडुन तिथेच गळ्याला बांधुन टिनाच्या शेडला अडकला व तळफळत अवस्थेत होता. तात्काळ पोलिसांनी धाव घेत त्याला पोलिस वाहनात टाकुन ग्रामीण रुग्णालय येथे नेवुन उपचार केलेत व जिल्हा रूग्णालयात चंद्रपूर साठी रेफर केलेत परंतु रूग्नवाहीकेत टाकेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक,अप्पर पोलिस अधीक्षक,ब्रह्मपुरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. मृतांचा शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे होणार आहे.
पुढील तपास उपविभागीय अधिकारी अमोल शिंदे हे करीत आहेत.