शिव कामगार सेनेचा चक्का जामचा इशारा.

प्रतिनिधि :- अमान कुरेशी

शिव कामगार सेनेचे जिल्ह्य अध्यक्ष रब्बानी चिस्ती यांनी चंद्रपूर वासीयांना नविन वर्षाच्या शुभेच्छा देन्याकरीता , सावरकर चौक , चंद्रपूर येथे , दिनांक १/१/२०२१ रोजी बॅनर लावले होते .

सदर बॅनर वाहतूक पोलीस निरीक्षक यादव यांचे आदेशानुसार वाहतूक पोलीसांनी . काढलेत . परंतु बॅनर मुळे , कोणत्याही प्रकारच्या वाहतूकीला अडथळा निर्माण होत नव्हता , त्या चौकात ईतरही दुसऱ्या नेत्यांचे बॅनर लावलेले होते . वास्तवीक यादव वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी आपल्या अधीकार क्षेत्राच्या बाहेर जाउन काम केलेले आहेत. असा गंभिरआरोप चित्ती यांनी केला आहे. वाहतुक पोलिस निरीक्षक यादव यांचे वर कायदेशीर कार्यवाई करण्यात यावी अन्यथा चक्का जाम करण्याचा ईशारा चिस्ती यांनी दिला आहे.