Chandrapur l सिंदेवाही पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन.

सिंदेवाही पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

  1. आज दिनांक ३१/१२/२०२० रोजी सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी मेंढा येथे तिन रस्त्याच्या ठिकाणी मोटारसायकल चालक गणेश मेश्राम हा त्याचे स्वतःचे मोटारसायकल वरून रस्त्याचे शेजारी गंभीर जखमी अवस्थेत पडून होता.

त्याच दरम्यान सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घारे हे ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने तांबेगडी मेंढा येथील बुथ तपासणी करून येत असताना त्यांचे निदर्शनास सदरची बाब आली.त्यांनी ताबडतोब पोलीस वाहन थांबवून जखमीला आपल्या वाहनात टाकुन त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे भरती करून जखमी वरती उपचार केलेत.वेळीच उपचार मिळाल्याने जखमिचि प्रकृती स्थिर आहे.

पोलीस निरीक्षक योगेश घारे,रणधिर मदारे,वाहन चालक शेन्डे. यांचे गणेश मेश्राम यांच्या कुटुंबातील लोकांनी पोलिसांचे आभार मानलेत तसेच स्थानिक नागरिकांनी देखील पोलिसांचे कौतुक केलेत.