चंद्रपूर : पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे ५१,३९,१५०/- रुपयाची अवैध देशी व विदेशी दारू केली नष्ट.

सिंदेवाही पोलिस स्टेशनचे हद्दीत जिल्ह्याबाहेरून आलेली अवैध देशी व विदेशी दारू १२१ गुन्ह्यात ५१,३९,१५०/- रुपयांची कारवाई अंतर्गत दारु जप्त केली होती. अवैध देशी विदेशी दारू साठा पोलिस स्टेशन सिंदेवाही च्या आवारात नाश केली. 

′दारू नाश करण्यासाठी रोड रोलरचा वापर करण्यात आला, तर विदेशी दारू नाश करण्यासाठी जे. सि. बी. चे साह्याने खड्डा खोदून पुरल्या गेली. 

सदरची कारवाई वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे psi तोंडे व त्यांचे कर्मचारी तसेच सिंदेवाही चे पोलिस निरीक्षक योगेश घारे, psi सुशिल सोनवणे, विलास गेडाम उपस्थितीत होते.